मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा ; बीडमध्ये मराठा आरक्षण जनसुनावणी; राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी स्विकारली निवेदने

बीड, (प्रतिनिधी):- मराठा समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा अशी मागणी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांकडे केली. सकाळी ११ वाजता बीड येथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे झालेल्या जनसुनावणीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा एकमुखी सूर अनेकांनी व्यक्त केला.
बीड येथे आज सकाळी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे मराठा आरक्षण जनसुनावणी घेण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत जनसुनावणी सुरु होती. यावेळी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दल सदस्यांपुढे मत व्यक्त केले. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे पुरावे आकड्यांसह सदस्यांपुढे मांडण्यात आले. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचा एकमुखी सूर या जनसुनावणीत उमटला. मराठा समाजाचे मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीने ओबीसी प्रवर्गामधून काही ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही यावेळी नमुद करण्यात आले. शिवसंग्रामच्यावतीने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट समावेश करावा अशा मागणीचे निवेदन राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना देण्यात आले. दुपारपर्यंत विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मराठा आरक्षणाशी संबंधित निवेदने आणि त्यासोबत पुरावेही राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपुढे मांडले. मराठा क्लबच्यावतीने अशोक सुखवसे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन देवून मराठा समाजाचा सर्वांगीण मागासलेपणाच्या आधारे इतर मागासवगर्ात समावेश करावा अशी मागणी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.