लाइव न्यूज़
औरंगाबादमधील शाळा गुरुवारी बंद
Beed Citizen | Updated: March 7, 2018 - 11:11pm
औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावरुन आंदोलन पेटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या प्रश्नावर बुधवारी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ९ पोलीस आणि काही नागरिक जखमी झालेत. त्यांच्यावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड केली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. या आंदोलनामुळे औरंगाबाद-मुंबई महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. शालेय विद्यार्थ्यांनाही या आंदोलनाचा फटका बसला होता. अनेक भागात विद्यार्थी अडकून पडले होते.
Add new comment