५० रुपयांच्या आमिषाने पोलवर चढला, शॉक लागून जीव गमावला
बीड । प्रतिनिधी
—————————————
दिंद्रुड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
. दिंदृड येथे वीज जोडणीसाठी विद्यूत खांबावर चढलेल्या शेतकऱ्याचा अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. बळीराम माने असे शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या उपाभियंत्यासह एकाही कर्मचाऱ्याला विद्यूत पोलवर चढता येत नसल्याने ५० रुपयांचे आमिष दाखवून शेतकऱ्याला विद्यूत पोलवर चढवण्यात आले. वीज जोडणीचे काम सुरू असताना वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अचानक विद्यूत प्रवास सुरू झाला. यावेळी पोलवर असणाऱ्या बळीराम माने या शेतकऱ्याला जोराचा झटका लागला. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. यावेळी शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या उपाभियंत्यास आणि दोन कर्मचाऱ्यांना चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी तिनही कर्मचाऱ्याना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Add new comment