लाइव न्यूज़
लाच घेताना जीएसटी अधिकारी अटकेत; उस्मानाबादेत कारवाई
Beed Citizen | Updated: March 7, 2018 - 3:58pm
उस्मानाबाद-व्यापाऱ्याकडून १ लाखाची लाच घेताना उस्मानाबादेत जीएसटी कार्यालयाचा अधिकारी बलभीम आगरकरला एसीबीने मंगळवारी अटक केली. आगरकरने एका नोंदणीकृत व्यापाऱ्याला २०१५-१६ या वर्षाच्या व्हॅटप्रकरणी नोटीस बजावली होती. सुनावणी घेऊन नोटीस फाइल करण्यासाठी तसेच यापूर्वीच्या व्हॅट प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची मागणी केली होती. उस्मानाबादेतील विक्रीकर कार्यालयातच लाचेचा पहिला १ लाख रुपयांचा हप्ता स्वीकारताना आगरकरला रंगेहाथ अटक झाली.
Add new comment