पत्नीने केला हातोड्याने पतीचा खुन....

अजय बाेराडे
———————————————.
पतीसोबत सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीने रात्री झोपेत असतांना लोखंडी हातोड्याने पतीच्या गळ्यावर व गुप्तअंगावर वार करुण ख़ून केल्याची खळबळजनक घटना सिल्लोड तालुक्यातील लोणवाडी शिवारात सोमवारी (दि5)रोजी रात्री घडली. कृष्णा पांडुरंग पल्हाळ (21) रा. आसेगाव ता. गंगापूर असे मयत तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती अशी की, मयत तरुण आपल्या पत्नीसह महिनाभरापूर्वी लोणवाडी येथील सोनाजी साबळे यांच्याकड़े मेंढ़या सांभाळण्यासाठी कामाला आलेला होता. सोमवारी नेहमी प्रमाणे सायंकाळी शंकर सुलताने यांच्या शेतात(गट नं.261) मध्ये मेंढ़या बसवल्या होत्या. त्यानंतर दोघांनी सोबत जेवण करुण ते झोपी गेले. सकाळी मेंढ़याचा मालक सोनाजी साबळे यांनी दोघांना झोपेतुन उठवले. तेव्हा कृष्णा उठला नाही. तो मृत अवस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, बीट जमादार मदन नागरगोजे, विलास सोनवणे. आय बाईक तपास पाथकाचे शांताराम सपकाळ रमेश काजाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुण पंचनामा केला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मयताचे वडील पांडुरंग नारायण पल्हाळ रा. आसेगाव ता. गंगापूर यांच्या तक्रारीवरुण आरोपी मयताची पत्नी नर्मदा उर्फ़ रेणुका कृष्णा पल्हाळ (19) रा. आसेगाव ता. गंगापूर विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहे. दरम्यान आरोपीने गुह्याची कबुली दिल्याची माहिती बीट जमादार मदन नागरगोजे यांनी दिली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.