लाइव न्यूज़
शिवसंग्रामची घोषणाबाजी; बोंडअळीच्या सरसकट पंचनाम्यासाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे
Beed Citizen | Updated: March 7, 2018 - 3:07pm
चुकीचे पंचनामे करणार्या अधिकार्यांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय!
बीड, (प्रतिनिधी):- चुकीचे पंचनामे करणार्या अधिकार्यांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा घोषणा देत शिवसंग्रामने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. जिल्हाकचेरीसमोरी धरणे आंदोलन करत जिल्ह्यातील बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त कापूस पिकाचे सरसकट पंचनामे करुन शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
बीड जिल्हा कचेरीसमोर शिवसंग्राम युवक आघाडीच्यावतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बोंडअळी बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांचे सरसकट फेर पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हा प्रशासन शेतकर्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असुन बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या कापूस पिकाचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड तालुक्यातील २२ महसुल मंडळ सज्जापैकी कृषि विभागाच्या अहवालात चौसाळा आणि नेकनूर दोनच मंडळाचा समावेश केला आहे. त्यामुळे फेर पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, अ शोक लोढा, भारत काळे, आदिंची उपस्थिती होती.
Add new comment