मोबाईलचा आयएमईआय बदलणारे चौघे गजाआड

बीड, (प्रतिनिधी):- मोबाईल चोरून त्याचे आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.घनश्याम पाळवदे व त्यांच्या टिमला यश आले आहे. शिवाजीनगर हद्दीत एका घरावर छापा टाकून पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांच्याकडून २७ मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाख १ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरून त्याचे आयएमईआय क्रमांक बदलणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. घनश्याम पाळवदे व त्यांच्या टिमने संबंधीत घरावर छापा टाकला असता त्याठिकाणी गहिनीनाथ मनोहर पाळवदे (वय २८, रा.रहेमत नगर, बीड) हा संगणकाद्वारे मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलतांना आढळून आला. सदरील नंबर बदलण्यासाठी मदत करणारे व चोरीचे मोबाईल त्याच्याकडे घेवून येणारे सतिश सुखदेव गायकवाड (वय २१, रा.हिवरसिंगा ता.शिरूर), सुभाष अर्जुन गायकवाड (२८, रा.शिरापुर धुमाळ, ता.शिरूर) आणि अंकुश विश्‍वनाथ काळे (३२ रा.विठ्ठल नगर, बीड) या चौघाजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आयएमईआय नंबर बदललेले ६ व अन्य २१ असे २७ मोबाईल मिळून आले. आयएमईआय नंबर बदलण्यासाठी वापरण्यात येणारे संगणक मॉनिटर, सीपीओ, कि पॅड, राऊटर आदी ३ लाख १ हजार ९०० रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी चौघांविरूध्द शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असूनत्यांच्याजवळ नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील चोरी केलेले मोबाईल आढळून आली ही कामगिरी सपोनि दिलीप तेजनकर, पोहेकॉ तुळशीराम जगताप, मोहन क्षीरसागर, शेख सलिम, पोना मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, विष्णु चव्हाण, अशोक हंबर्डे, चालक मुकुंद सुस्कर, महिला पोलिस सिरसठ यांनी केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.