एमआयएमचे उपोषण ठरले फार्स; वीस तारीख होऊनही मोमीनपुर्‍यातील एक दगडही हलला नाही!

बीड (प्रतिनिधी)- शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर भागातील रस्ता रुंदीकरण प्रश्‍नी एमआयएमचे गटनेते, नगरसेवक यांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण केले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा मुख्याधिकार्‍यांनी २० फेब्रुवारीपर्यंत काम सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. २० तारीख होऊन पंधरा दिवस उलटले तरीही मोमीनपुर्‍यातील रस्त्यावरील साधा दगडही हलला नसल्याने एमआयएमचे उपोषण केवळ फार्स ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होवू लागली आहे. पालिकेत एमआयएमच्या स्वतंत्र गटाचा बांधकाम सभापती असतांनाही एमआयएमने केलेले उपोषण म्हणजे फोटो सेशन होते की काय? असाही प्रश्‍न उपस्थित होवू लागला आहे.
बीड शहरातील मोमीनपुरा, अशोकनगर भागातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्‍न गेल्या वर्षभरापासुन रखडला आहे. शहरभर रस्त्याची आणि नाल्यांच्या कामाचा धुमधडाका सुरु असतांना येथील रस्ता रुंदीकरणप्रश्‍नी पालिका प्रशासनाकडून ब्र देखील उच्चारला जात नाही. याच प्रश्‍नावर एमआयएमचे गटनेते आणि अन्य काही नगरसेवकांनी पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. एमआयएमने उपोषण सुरु केल्याने हा प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त  केली जात होती. त्याचबरोबर पालिकेत एमआयएमच्या स्वतंत्र गटाचे बांधकाम सभापती असतांनाही एमआयएमचे उपोषण म्हणजे केवळ फार्स आहे की काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात होता. एमआयएमच्या उपोषणाची दखल घेत त्याच दिवशी रात्री उशिरा मुख्याधिकार्‍यांनी लेखी पत्र देत २० फेब्रुवारीपर्यंत मोमीनपुरा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु होईल असे आश्‍वासन दिले होते. २० तारीख होवून पंधरा दिवस उलटले तरीही मोमीनपुरा भागातील साधा दगडही उचलण्यात आलेला नाही. कामाचा तर प्रश्‍नच नाही असे असतांनाही उपोषण करणारे मात्र अजुनही बघ्याच्या भुमिकेतच दिसत आहेत. शहरभर विकासकामे सुरु असतांना मोमीनपुरा भागातील नागरिकांना मात्र पालिका प्रशासनाने वेठीस धरल्याने आणि काही लोकांकडून या प्रश्‍नाचे राजकारण होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.