मतदासंघातल्या प्रलंबीत विकास कामांच्या संदर्भात उपविभागीय अधिका-यांना प्रकाश सोळंकेंनी दिले निवेदन
माजलगांव, दि. 6 प्रतिनिधी: माजलगांव मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामांच्या संदर्भात तसेच परडी माटेगांव, लवुळ या रस्त्यासाठी माजलगांव - तेलगांव या राष्ट्रीय महामार्गावर 14 मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिका-यांना दिला असुन बीड - परळी रेल्वे मार्गाचा शेतक-यांना योग्य मावेजा द्यावा यासह विवीध कामाच्या विषयावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांचेशी एक तास सकारात्मक चर्चा केली.
याबाबत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी वडवणी तालुक्यातील शेतक-यांना एक भाव बीडच्या शेतक-यांना एक भावा असा दुजाभाव शासनाने केला आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय होत असुन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी उपविभागीय अधिक-यांकडे केली तर रेपेवाडी - पाचपिंपळगांव तांडा साठवण तलावाच्या पुर्नवसन प्रस्तावित असुन सदर प्रकल्प पाच वर्षांपेक्षा जास्त कालावाधी झालेला आहे. त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली. माजलगांव विधानसभा मतदारसंघातील माजलगांव, धारूर व वडवणी तालुक्यातील विवीध प्रकल्पासाठी जमीन संपादीत केेलेले अनेक प्रकरणे प्रलंबीत असुन ती मार्गी लावण्यात यावीत, शासकीय धान्य खरेदी केंद्राबाबत माजलगांव मतदारसंघातील शेतक-यांसाठी तुर खरेदीसाठी खरेदी - विक्री संघाच्या वतीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले परंतु शेतक-यांची तुर खरेदी बंद आहे. त्यामुळे त्या तुरीस तात्काळ गोदाम सुरू करण्यात यावे अशा विवीध मागण्यांवर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी उपविभागीय अधिकारी श्रीमती पवार यांना भेटुन सकारात्मक चर्चा केली तसेच या सर्व विषयांवर दि. 1 एप्रिल पर्यंत तोडगा न निघाल्यास माजलगांव मतदारसंघातील शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणाार असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी विश्वांभर थावरे, दयानंद स्वामी, डाॅ. भगवान सरवदे, कचरू तात्या खळगे, शेख मज्जिद, विजय अलझेंडे, रोहन घाडगे, नवाब पटेल यांचेसह शेकडो कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.
Add new comment