कुंडलीका नदीच्या पात्रात बुडुन चिमुकलीचा मृत्यू
वडवणी (प्रतिनिधी):-
वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील एका ७ वर्षीय बालिकेचा गावालगत असलेल्या कुंडलिका नदीतील पाण्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली असुन गेल्या तिन महिण्यातील गावातील ही दुसरी घटना असल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील परडी माटेगाव येथील मंजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरणारे विजय गायकवाड हे आजाराने त्रस्त आसल्याने ते पुणे येथे गेली दोन महिण्यापासुन उपचार घेत आहेत. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी देखील गेल्याने त्यांची एकुलती एक विजया ही आपल्या आजोबा जवळ राहत होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर घराच्या कडेला खेळत आसतांना गावा शेजारील कुंडलीका नदी आसल्याने त्या पात्रातील पाण्यात पडुन बुडुन मृत्यु झाल्याची घटना काल सोमवार रोजी दुपारी ३ वाजता घडली. गेल्या तीन महिण्याच्या कालावधीत तिन वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना घडली होती. या लगातार दोन घटनेने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाय योजना करून संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी गावचे नवनिर्वाचित सरपंच अॅड. माधव शेंडगे यांनी केली आहे.
Add new comment