लाइव न्यूज़
मराठा महासंघाचे "समाजभूषण " पुरस्कार जाहीर
मंगेश पोकळे , गोविंद शेळके , भागवत तावरे ,उद्धव मोरे , धनंजय गुंदेकर , किशोर पिंगळे , बबनराव शिंदेंचा होणार सन्मान
बीड (प्रतिनिधी) अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे "समाजभूषण " पुरस्कार जाहीर झाले आहेत . येणाऱ्या ११ मार्च रोजी भव्य समारोहात सदरील पुरस्काराने जिल्ह्यातील नामवंत सात व्यक्तिमत्व सन्मानित करण्यात येणार आहेत . पत्रकार भागवत तावरे सह मंगेश पोकळे , गोविंद शेळके , उद्धव मोरे , धनंजय गुंदेकर , किशोर पिंगळे , बबनराव शिंदेंचा यात समावेश असून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या सह विनायक पवार, राजेंद्र कोंढरे, दिलीप जगताप, नरेंद्र अण्णासाहेब पाटील(आमदार), विनोद अप्पा इंगोले, दशरथ पिसाळ, उल्हास गिराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक किशोर गिराम (अखिल भारतीय युवक मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ) यांनी कळवली आहे .
११ मार्च २०१८ रोजी साय ७ वाजता पांगरी रोड गिराम नगर येथील भव्य प्रांगणात शिवव्याख्यान व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे . शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद यांचे शिवव्याख्यान व पत्रकारिता वकील व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना सदरील पुरस्कार दिला जाणार आहे . निर्भीड लिखाण अन समाज प्रबोधन या गटात एबीपीचे गोविंद शेळके दैनिक लोकाशाचे वृत्तसंपादक भागवत तावरे , रिपोर्टर चे धनंजय गुंदेकर , जय महाराष्ट्रचे उद्धव मोरे , वकील क्षेत्रात काम करणारे मंगेश पोकळे , शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे बबनराव शिंदे , समाजसेवा करणारे किशोर पिंगळे यांना भव्य सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे अखिल भारतीय युवक मराठा महासंघाकडून किशोर गिराम यांनी दिली आहे .
Add new comment