शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नसता भाजपा आमदारांना गावोगाव फिरू देणार नाहीत
खांडेंच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'शिवसेना आपल्या दारी' अभियानात शेतकऱ्यांचा भाजपाला इशारा
बीड (प्रतिनिधी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून, शिवसेना नेते ना. रामदास कदम व संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव इत्यादी विषयांवर थेट शेतकऱ्यांच्या दारोदार जाऊन विचारपुस करणाऱ्या शिवसेना आपल्या दारी अभियानात आज उमरद (खालसा), भाटसांगवी, राक्षसभुवन या गावांमधील शेतकऱ्यांशी शिवसैनिकांनी संवाद साधला. 'सरकार! शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नसता भाजपा आमदारांना गावोगाव फिरू देणार नाहीत' अशा सज्जड स्वरूपाचा इशाराच यावेळी शेतकऱ्यांनी अभियानातील भेटीदरम्यान भाजपाला दिला.
शेतकरी आपल्या दारी आभियानात आज शेतकऱ्यांनी शिवसेनेकडे आपल्या भावना व्यक्त करत कर्जमाफीबाबत सत्य माहीती दिली. 'ही कर्जमाफी फक्त घोषणेपुरती असून भाजपाने शेतकर्यांना फसवण्याचेच काम केले आहे, जर संपुर्ण कर्जमाफी दिली नाही तर येत्या काळात भाजपा आमदारांना गावोगाव फिरू न देण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. आज सकाळी अभियानाच्या दुसऱ्या दिवशी उमरद खालसा, राक्षसभुवन, भाटसांगवी या गावातील शेतकऱ्यांच्या भेटी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घेतल्या. या वेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह तालुकाप्रमुख उल्हास गिराम, रतन गुजर, बबन पवार, अशोक वाकडे, माळापुरी येथील कांता ढास, मच्छिंद्र पडुळे, राजू बेग, समीर मिर्झा, अकबर बेग, उमरद खालसा येथील घोडे, कल्याण जाधव, कचरू जाधव, दशरथ जाधव, गणेश घोडे, दत्ता जोगदंड, राक्षसभुवन येथील झुंबर मस्के, बाबासाहेब गाडे, अशोक लोणकर, सुग्रीव मस्के,श्रीकृष्ण लोणकर, रमेश मस्के, विठ्ठल मस्के, भाटसांगवी येथील नितीन सोनवणे, अमोल सोनवणे, सागर छत्रभुज यांच्यासह गावोगावचे शेतकरी, ग्रामस्थ, ठिकठिकाणचे शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Add new comment