कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे जिल्हयातील कापुस उत्पादक शेतकर्यावर अन्याय- राजेंद्र मस्के
कृषी अधिकारी म्हणजे झारीतीली शुक्राचार्य
बीड :(प्रतिनिधी ०४ मार्च) बीड तालुक्यातील कापुस उत्पादरक शेतकरी बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे संकटात सापडलेले असतांना जिल्हयातील कृषी विभागामार्फत जो अहवाल शासनाकडे दिला आहे. त्या मध्ये बीड तालुक्यातील फक्त दोनच महसुल मंडळांचा बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे नुकसान झाल्याचा अहवाल झारीतील शुक्रचार्य असणारे कृषी विभागातील अधिकारी यांनी दिला आहे.कृषी विभागातील अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे कापुस उत्पादक शेतकर्यावर अन्याय झाल्याचा आरोप शिवसंग्राम प्रदेश युवक अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड तालुक्यातील सौंदाना येथील शिवसंग्राम शाखा उद्घाटन प्रसंगी बोलतांना केला आहे. या शाखा उद्घाटन कार्यक्रम सोहळयास रामहारी भैया मेटे, पंचायत समिती ज्ञानेश्वर कोकाटे, युवा नेते तालुका अध्यक्ष बबन माने, जिल्हा युवक अध्यक्ष राजेंद्र बहिर, तालुका युवक अध्यक्ष गणेश मोरे, विजय सुपेकर, बद्रिनाथ जटाळ आदि मान्यवरांच्या उपस्थितीत बोलतांना राजेंद्र मस्के म्हणाले की, शेतकरी नेहमीच कोणत्यान कोणत्या नैर्सगीक संकटाला सामोरे जात आहे. कधी दुष्काळ तर कधी ना पिकी आणि या वर्षी बोंड अळीच्या प्रार्दुभावामुळे कापुस उत्पादक शेतकर्याचे आर्थीक कंबरडे मोडले आहे. संपूर्ण राज्यात शेतकर्यांचे बोंडअळीमुळे नुसकान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. या मुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आत्महत्यासारख्या वाईट बाबीचा विचार मनात आनुण आपली जिवन यात्रा संपवण्याचे सत्र दिवसोंदिवस वाढत चाललेले आहे. या बोंडअळीच्या प्रार्दुभावाच्या बाबतीत राज्य शासनाने याची दखल घेतलेली आहे. या बिकट परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. परंतु कृषी विभागातील अधिकार्यांनी प्रत्यक्षात परिस्थिती जाणुन न घेता कार्यालयातील वातानुकूलीत कॅबिन मध्ये बसुन अहवाल तयार केला आहे. तालुक्यातील फक्त दोनच महसुल मंडळामध्ये बोंडअळी प्रार्दुभावाने नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे दिला आहे. हा हालगर्जीपणा आणि अन्याय शेतकरी कधापी सहन करणार नाही. शेतकर्यांच्या विरोधात अहवाल पाठवनारे झारीतील शुक्राचार्य जे कोणी असतील त्यांना शिवसंग्राम धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड ईशारा शिवसंग्राम प्रदेश युवक अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे. या कार्यक्रमासाठी पांडुरंग आवारे, सुधाकर चव्हाण, त्रिंबक चव्हाण, सतिष शेळके, सरपंच राम जाधव, चेअरमणकल्याण पवार महेश सावंत, परमेश्वर गायके यांच्या सह सौंदाना येथिल ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
मा.आ. विनायकराव मेटे यांच्या आदेशावरून दि. ६/०३/२०१८ मंगळवार रोजी सकाळी ११.०० वा. बोंडअळी प्रार्दुभावामुळे नुकसानग्रस्त कापुस उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणेसाठी सरसकट पंचनामे करावेत या संबंधीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला या पूर्वीच दिलेले आहे. हे पंचनामे सरसकट करून सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणी संदर्भात आंदोलनाची दिशा भरवण्यासाठी शिवसंग्राम कार्यकर्त्याची महत्वपूर्ण बैठक शिवसंग्राम भवन येथे आयोजीत केली आहे. या बैठकीस कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे अवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
Add new comment