लाइव न्यूज़
खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नाने बीड मध्ये सुरू होणार पासपोर्ट कार्यालय- सलीम जहांगीर
बीड- पासपोर्ट कार्यालय बीड येथे सुरू करण्याची मागणी खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केली होती. या साठी लगण्यार्या जागेची अडचण येत होती त्या संदर्भात खा.डॉ. प्रीतमताई यांनी प्रशासनाला सूचना देत लवकरात लवकर जागा निश्चित करून कार्यालय सुरू करण्यास सांगितल्या नंतर तात्काळ अधिकार्यांनी पाहणी करून राजुर वेस,मुख्य डाकघर (पोस्ट ऑफिस) येथे एक महिन्यात कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा विकास सनियंत्रण व समन्वय दिशा समितीचे सदस्य सलीम जहांगीर यांनी दिली.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील नागरिकांना विदेशात जाण्यासाठी लागणारा पासपोर्ट काढण्यासाठी पुणे,मुबईच्या चकरा माराव्या लागत असल्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक आणि वेळेचे नुकसान होत असल्याने मराठवाड्यात हे कार्यालय सुरू करण्याची मागणी खा. प्रितमताई मुंडे यांनी लोकसभेत केली होती. विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी या मागणीची दखलं घेत औरंगाबाद आणि बीडला पासपोर्ट कार्यालय मंजूर केले होते. हे कार्यालय तात्काळ सुरू करण्यात यावे आशा सूचना खा. प्रीतम ताई मुंडे यांनी दिल्या होत्या परंतु जागेच्या अडचणी मुळे हे काम रखडले होते. या बाबत खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी तात्काळ अधिकारर्यांना सूचना देत जागा निश्चित करून लवकरात लवकर पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे सांगितले होते.या साठी जागेची पहानी करण्यासाठी जतीन पोटे हे अधिकारी बीड शहरात आले होत यावेळी जिल्हा विकास सनियंत्रण व समन्वय दिशा समितीचे सदस्य सलीम जहांगीर ,नवनाथ सानप, नूरलाला खान, अकबर खान उपस्थित होते. यावेळी पासपोर्ट कार्यालयाच्या जागेची पहानी त्यांनी केली. राजुर वेस,मुख्य डाकघर (पोस्ट ऑफिस) येथे हे कार्यालय होणार असून एक महिन्याच्या अात पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरू करणार असल्यासाचे या वेळी सलीम जहांगीर यांनी सांगितले. खा.डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्या सूचनेवरून जलदगतीने कामकाज सुरू असुन या कार्यालायमुळे व्यापारी, हज यात्रेकरू, नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे
Add new comment