डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचा चंदनसावरगावला रास्ता रोको

केज (प्रतिनिधी) फक्त कागदावरच विकास करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखालील चंदनसावरगाव येथे सोमवारी विराट रास्ता रोको आंदोलन करण्यात आले 
     शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जवळबनसह ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. तहसीलदार साहेबांना वारंवार निवेदन दिली. बांधकाम विभागाला चकरा मारल्या. आम्हाला रस्ता मिळत नसल्याची खंत व्यक्त करित डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी थेट तालुक्याचे आमदार निष्क्रिय असल्याचा आरोप केला. रस्ते. आरोग्यसेवा. सर्वासामान्य जनतेला सुविधा पुरविता येत नसतील. तसेच मागासवर्गीयांवर तालुक्यात होत असलेले हल्ले थांबवता येत नसतील तर आ. ठोंबरे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केली. ४८ तासात जवळबनसह ग्रामीण भागातील खड्डेमय रस्ते सुरळीत न झाल्यावर या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ. हिराचंद काळे. दत्ता भाकरे. अकाश सोनवणे. दत्ता लांडगे. दिलीप सोनवणे. भीमाशंकर गुजर. सुनील जोगदंड. संदीप करपे. शिवाजी शिंपले. दता करपे यांनी दिला आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.