केज गटसाधन केंद्र येथे आजच्या बारावीच्या सात केंद्रावर झालेल्या पेपरच्या उत्तर पत्रिका सिल केलेल्या जळून खाक.
केज (प्रतिनिधी) :
केज गटसाधन केंद्र येथे आजच्या बारावीच्या सात केंद्रावर झालेल्या पेपरच्या उत्तर पत्रिका सिल केलेल्या जळून खाक. आज रात्री.८ च्या सुमारास घटना निदर्शनास आली ११९९ ,उर्दू माध्यम १०९ व इतर ९ एकूण १३१७ विद्यार्थांचे नुकसान.
गटशिक्षण अधिकारी ढवळे बळिराम दगडू कार्यालयात तातडीने दाखल.
आज केज तालुक्यातील विद्यार्थ्यांनी गणिताचा पेपर दिला पेपर संपल्या नंतर सर्व पेपर येथील गट साधन कार्यालयात ५ वाजता सील करून एका खोलीत ठेवण्यात आले मात्र रात्री ८च्या सुमारास खोलीतून जाळ निघताना बाजूच्या लोकांनी पाहिले व पोलिस व कर्मचारी यांना घटने ची माहिती देण्यात आली अधिक्षक रोडे पण कार्यालयात दाखल झाले. मात्र तो पर्यंत सर्व ११९९ ; १०९ उर्दू व इतर ९ असे एकूण १३१७ गणिताच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत
पोलिस घटना स्थळी दाखल झाले आसुन पंचनामा सुरू आहे. आग कशामुळे लागली हे पोलिस तपासात निष्पन्न होईल मात्र १३१७ विद्यार्थी आडचणीत सापडले आहेत.
Add new comment