लाइव न्यूज़
पुणे कृषी आयुक्त कार्यालय समोरआमरण उपोषण बसणार--वसंत मुंडे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघातील कृषी खात्याने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत परळी वैजनाथ तालुक्यातील तीन वर्षा करीता 34 86 कोटी रूपये फंड आलेला होता. त्यामध्ये अधिकारी व राजकीय नेते गुत्तेदार यांच्या संगनमताने 18 कोटीचा भ्रष्टाचार आरोप वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाने कडे केलेला आहे. कृषी आयुक्त मा.सुनील केंद्रेकर यांनी नेमलेल्या दक्षता पथक पुणे यांनी 883 कामापैकी 307 कामे तपासणी त्यामध्ये 304 कामा अनियमता आढळली 576 कामे तपासणी नाहीत. त्यामध्ये 24 अधिकार्यांवर निलंबनाची कार्यवाही झाली आसुन 50% व 50% रक्कम अधिकारी व गुत्तेदाराकडुन वसुली करण्याचे आदेश कृषी आयुक्त पुणे दि.09 /12/2017 विभागीय कृषी आयुक्त औरंगाबाद जा.क्र.विकृसस/आस्था/अ-2/हजारे/ 7003/2017 दि.15 /12/2017
यांचा आदेश क्रमांक यांनी दिले आहे. निलंबित कर्मचारी व गुत्तेदारावर एफ.आय.आर. फौजदारी दाखल करण्याचे शासनाने आदेश गेल्या तीन महिन्यापुर्वी दिले आहेत. अद्याप कार्यवाही केली जात नसल्यामुळे दि.14 फेब्रुवारी 2018 ला तक्रार महाराष्ट्र शासनाकडे वसंत मुंडे यांनी दाखल केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे हे दि.05 मार्च रोजी पासून कृषी आयुक्त पुणे येथे आमरण उपोषण बसणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जलयुक्त शिवार अभियान योजने अंतर्गत सत्ताधारी व विरोधक मोठ्या प्रमाणावर संगनमताने राजकीय डावपेच आखुन भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठबळ देत आहेत. शासनाने गुत्तेदार व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून तात्काळ वसुली संदर्भात आदेश असतांना अंमलबजावणी होत नसल्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वसंत मुंडे यांनी दि.05 मार्च 2018 ला अमारण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला असून तात्काळ कार्यवाही करण्याचे शासनाने आदेश मा.आयुक्त कृषी पुणे यांना दिले आहेत. परंतु गैरव्यवहार मदत करणारे रमेश भताने जिल्हा कृषी अधिकारी बीड सद्या पदोन्नतीवर लातूर विभागीय सहसंचालक कृषी या पदावर कार्यरत असलेले यांच्यावर निलंबनाची व संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या कडून वसुलीची व गुन्हे दाखल करण्या संदर्भात कार्यवाही झाल्याशिवाय अमारण उपोषण मागे घेणार नाही अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती यांनी दिली आहे.
Add new comment