चौसाळा येथे ग्रामीण रूग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यासाठी ना.पंकजाताई मुंढे यांनी घेतला पुढाकार-रमेश पोकळे
चौसाळा (प्रतिनिधी) चौसाळा परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे हि मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती.या महत्त्वपुर्ण मागणीची दखल ग्रामविकास मंञी तथा पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतली असून लवकरच चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर होईल असा विश्वास भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोठ्या गावातील नागरिकांना आरोग्य विषयक उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्राथमीक आरोग्य केंद्राच्या दर्जावाढीचे प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयामार्फत मागवले होते. त्यानुसार चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंञी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यासाठी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेतला असुन लवकर चौसाळा परिसरातील नागरिकांचे स्वप्न साकार होणार असल्याचे रमेश पोकळे यांनी म्हटले आहे.
Add new comment