लाइव न्यूज़
कृषी विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे बीड तालुक्यातील बोंड अळी प्रार्दुभावग्रस्त शेतकर्यांवर अन्याय
Beed Citizen | Updated: February 24, 2018 - 3:10pm
बीड :(प्रतिनिधी 24 फेबु्रवारी ) यंदा कापुस पिकावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने तालुक्यातील बहुतांशी शेतकर्यांचे कापूस पीक हातचे गेले आहे. बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे शेतकर्यांना प्रचंड अर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कापुस हे नगदी पीक असल्याने मराठवाडा व विदर्भ भागात कापसाचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी अचानक बोंडअळीच्या आगमनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
या आपदग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने प्रशासनाला सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. 33 टक्के पेक्षा जास्त बोंड अळींचा प्रभाव झालेल्या शेतकर्यांना अनुदान देण्याचे धोरण शासनाने स्विकारले आहेे.
कृषी विभागाने महापराक्रम करून बीड तालुक्यातील 11 महसुल मंडळापैकी केवळ 2 महसुल मंडळामध्ये बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याचे लेखी अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. कृषी विभागाचा हा निर्णय शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे. अगोदरच शेतकरी हवाल दिल असुन कृषी विभागाने चक्क 80 टक्के तालुका वगळला आहे. हा सर्व्हे घरी बसुन केला की नशेत केला हे कळण्यास मार्ग नाही. कृषी विभागाची हि निर्दयी व मस्तवाल पणाची कार्यवाही तालुक्यातील शेतकरी कदापी सहन करणार नाही.
शेतकर्यांच्या हितासाठी प्रामाणीक व वास्तवपणे बोंड अळी प्रार्दुभावाचा खरा अहवाल शासनाला देऊन शेतकर्यांना सहकार्य करावे. अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल असा ईशारा तालुका आध्यक्ष बबन माने यांनी दिला आहे.
Add new comment