जोपर्यंत जाती आहेत तो पर्यंत जाती आधारित आरक्षण राहणार;सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा प्रयत्न झाल्यास तो उधळून लावू -ना. आठवले
मुंबई दि. 22 - या देशात जोपर्यन्त जाती आहेत तोपर्यन्त जातीवर आधारित आरक्षण राहणार .दलित आदिवासी ओबीसिंच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातीव्यवस्था नष्ट करा मग जाती आधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर सर्व ताकदीनिशी तो प्रयत्न हाणून पाडू. जाती नष्ट झाल्याशिवाय जाती आधारित अरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण या पुढील काळात असावे अशी भूमिका मांडली होती. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर असायला हवे या शरद पवारांच्या भूमिकेला केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या प्रसिद्धीपत्रकात ना रामदास आठवलेंनी शरद पवारांच्या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत . त्यांनी अनेकदा दलित आदिवासींची बाजू घेतली आहे. ते पुरोगामी समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते आहेत. मात्र त्यांनी सर्व आरक्षण आर्थिक निकषावर असावे. जातिच्या निकषावर आरक्षण नको असे शरद पवारांनी मत मांडल्याने त्यांच्या या भूमिकेचा आपण विरोध करीत असून कोणीही असा भविष्यात प्रयत्न केल्यास तो प्रयत्न हाणून पाडु. संविधानकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण हे दलित आदिवासींची कवचकुंडले आहेत. दलित आदिवासी ओबीसींच्या जाती आधारित आरक्षणाला आपण कधीही धक्का लागू देणार नसल्याचा ईशारा ना रामदास आठवलेंनी दिला आहे.
दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा ; लिंगायत ; ब्राह्मण आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवून 75 टक्के करण्यात यावी . सामाजिक आरक्षण 50 टक्के आणि आर्थिक निकषावरील आरक्षण 25 टक्के असे एकूण 75 टक्के आरक्षण केल्यास सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळुन आरक्षणावरून होणारी भांडणे मिटतील असा दावा ना रामदास आठवलेंनी केला असून आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी संसदेत कायदा करणे गरजेचे आहे. अशी आपल्या रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे ना रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आहे. दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेचे आपण स्वागत केले आहे असे ना रामदास आठवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
जोपर्यंत देशात जाती आहेत तोपर्यंत जातिआधारीत आरक्षण राहणार . जाती नष्ट करा मग जाती आधारित आरक्षण सोडू असे सांगत जोपर्यन्त जाती आहेत तोपर्यन्त जाती आधारित आरक्षण राहणार . जाती ऐवजी आर्थिक निकषावर आरक्षणाचा कायदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास तीव्र विरोध करून तो प्रयत्न हाणून पाडू . दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचा ईशारा ना रामदास आठवले यांनी दिला आहे.
Add new comment