संपादक दिलीप खिस्ती यांनी राेटरी सेंट्रलचा ‘सन्मान ज्येेष्ठ पत्रकारितेचा’ पुरस्कार जाहीर
रोटरी कलाविष्कार च्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा रविवारी रंगणार कलेचा सोहळा
बीड
राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ संपादक यांचा ‘सन्मान ज्येष्ठ पत्रकारितेचा’ पुरस्कार देऊन गाैरविले जाते. यंदाचा हा पुरस्कार लाेकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती यांना जाहीर झाला अाहे. हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल च्या वतीने अायाेजीत बीडमध्ये २५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या कलाविष्कार साेहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरीत केला जाणार अाहे. या साेहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदचे अध्यक्ष सवीता गाेल्हार अाणि नगर पालिकेचे नगराध्यक्ष डाॅ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते हाेणार अाहे, अशी माहिती सेंट्रल चे अध्यक्ष गणेश वाघ यांनी दिली.
रोटरी सेंट्रल च्या मागील वर्षी या स्पर्धेत सुमारे ११६ समुहांनी नृत्यासाठी ६५० कलावंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदत धडाकेबाज नृत्य सादर केले. सांस्कृतीक परितोषिके पटकवण्यासाठी शाळा- शाळेतील कलावंत विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षी चुरस निर्माण झाली होती. तोच स्पर्धेचा थरार व तोच अनुभव यंदाच्या स्पर्धेत दिसुन येणार आहे. रोटरी कलाविष्कार ही एक दिवसीय स्पर्धा २५ फेब्रुवारी रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असून याचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सवीता गाेल्हार अाणि बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष डाॅ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते हाेणार अाहे. या स्पर्धेसाठी यावर्षी नऊशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या नाेंदणी झालेल्या अाहेत. या कार्यक्रमात विशेष म्हणजे लाेकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती यांना ‘सन्मान ज्येष्ठ पत्रकारितेचा’ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार अाहे. या साेहळ्यास पालक, विद्यार्थी, कलाप्रेमी, पत्रकार, वाचकांनी माेठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अावाहन सेंट्रलचे अध्यक्ष गणेश वाघ, सचिव सुकेश राव, संस्थापक अध्यक्ष संदेश लाेळगे, राजीव संचेती, गिरीष गिलडा, परमेश्वर जाधव, डाॅ. शाम चरखा, अजय घाेडके, महेश जाेशी, हेमंत बडवे, गोपाल मूंदडा, रवी उबाळे, संतोष बजाज, समाधान कुलकर्णी, विश्वास शेंडगे, अतुल जाजू, ज्ञानेश्वर तांबे, कचरु चांभारे, प्रमाेद करमाळकर, अभिनंदन कांकरिया, गोविंद बाहेती, मुकेश अाग्रवाल, नागेश अंदुरे, विवेक शिंदे, सुहास बेदरे, संतोष बाजाज, विश्वास शेंडगे यांच्यासह राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलच्या सर्व पदाधिकारी यांनी केले.
Add new comment