बीड जिल्ह्यातील छावणी घोटाळा प्रकरणी कारवाईचे संकेत

न्यायालयाने फटकारताच  सातार्‍यात सव्वाशे जणांविरूध्द गुन्हे दाखल
बीड, (प्रतिनिधी):- राज्यात दुष्काळामध्ये सुरू केलेल्या चारा छावण्यांमधून तब्बल २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला होता.  सरकार कोणतीच कारवाई करत नसल्याने दोन दिवसांपुर्वीच न्यायालयाने या प्रकरणात नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले होते. न्यायालयाने टकारताच सर्वच जिल्हास्तरावरील प्रशासन खडबडून जागे झाले असून सातारा जिल्ह्यातील माणमध्ये ९४ तर लटणमधील १८ छावणी चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बीडमधील चारा छावणी घोटाळा देखील पुन्हा चर्चेत आला असून याप्रकरणातही प्रशासकिय पातळीवरून कारवाईचे संकेत मिळू लागले आहे. 
राज्यात सन २०१२-१३-१४ मधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पशुपालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. १२७३ छावण्यांमधूून जनावरांना ओला, सुखा चारा, पेंड असे खाद्य दिले जात होते. मात्र छावणी चालकांनी त्यामध्ये कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला होता.१२७३ पैकी १०२५ छावण्यांमध्ये अनियिमतता आढळून आली होती. या सर्व प्रकारातून तब्बल २०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. विरोधक म्हणून भाजपने हा मुद्या उचलून धरत याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. सत्तेवर येताच भाजपला या प्रश्‍नाचा विसर पडला.  भ्रष्ट चारा छावणी चालकांविरूध्द कारवाई करावी यासाठी शेतकरी गोरख घाडगे यांनी न्यायालयीन लढा सुरू केला होता. दोन वर्षानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला असून घाडगे यांच्या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने दोन दिवसांपुर्वीच सरकारला फटकारले होते. याप्रकरणाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता असली तरी न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने फटकारताच सातारा जिल्ह्यातील माण आणि लटण येथे २०१३ मधील चारा छावणी घोटाळा प्रकरणी कारवाईला सुरूवात झाली आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता शिंगल यांनी माणमधील ९४ तर लटणमधील १८ छावणी चालकांना दणका देत या सर्वांविरूध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील चारा छावणी घोटाळाही राज्यात गाजलेला असून याप्रकरणातही कारवाईचे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळू लागले आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.