विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केद्रींत करून भविष्याची वाटचाल करावी-डॉ.योगेश क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी गुणात्मक दृष्टीकोण ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. स्पर्धेच्या युगामध्ये गुणवत्ता असेल तरच पुढे जाण्याची संधी सहज प्राप्त होते असे प्रतिपादन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहबीड येथील मिल्लीया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ.योगेश क्षीरसागर,  महाविद्यालयाचे प्राचार्य.मुहम्मद इलीयास, हमीद चाऊस, उपप्राचार्य डॉ.हुसेनी, डॉ.सय्यद हनिप, संस्थेच्या सचिव खान सबीया मॅडम, डॉ.एन.एन.काळे आदी उपस्थित होते. यावेळी मिल्लीय्या संस्थेच्या विद्यार्थ्यानी विविध विभागात पटकावलेल्या बक्षीसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी बोलतांना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासासाठी, सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपले कौशल्य दाखविण्यासाठी खेळ व विविध स्पर्धा हे एक चांगले माध्यम आहे. कोणतेही काम हे लहान नसून जीवनात पुढे जाण्यासाठी परिश्रमाची गरज आहे तसेच शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्याचा सहभाग महत्वाचा आहे. लहान पणापासून विद्यार्थ्यावर गुणात्मक दृष्ट्या संस्कार केले तर महाविद्यालयीन जीवनात भविष्याची वाटचाल कशी करायची हा विचार घेवून ते पुढे जातात. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून स्पर्धेकडे वाटचाल करीत असतांना गुणात्मक दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणासाठी कुठल्याही क्षेत्रात विषयानुरूप मिळालेल्या गुणांवरच आपले धेय साध्य करता येते. ज्या क्षेत्रात आपल्याला प्रगती करायची आहे त्या क्षेत्राची परिपुर्ण माहिती असणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञान निर्माण होवू लागले आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये अभ्यासक्रमातही बदल होवू लागले आहे या बदलाकडे गांभिर्याने लक्ष देवून अभ्यास केला तर निच्छीत यशाचे शिखर गाठता येते असे सांगुन त्यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतूक केले. यावेळी महाविद्यालयाच्या मान्यवरांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.