लाइव न्यूज़
बीड जिल्हय़ातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याधयापकांचे दोन दिवसीय 'शाळा सिद्धी ' प्रशिक्षण सुरू
बीड (प्रतिनिधी ) बीड जिल्हय़ातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याधयापकांचे दोन दिवसीय 'शाळा सिद्धी ' प्रशिक्षण आज यशवंत राव चौहान पालीटेकनिक येथे सुरू झाले.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीस डायट अंबाजोगाईचे सुलभक शेख ईसाक यांनी प्रास्तविक केले. बालकांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी, परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत आहे. महणून शालेय शिक्षण क्षेत्रात शाळा , त्यांची कामगिरी व सुधारणाकेंद्रीत गुणवत्ता पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महणूनच शालेय सुधारणाकेंद्रीत सर्वंकष व सर्वांगीण शालेय मुलयांकन यत्रंणा विकसित करण्यात आली आहे. या मुलयमापन आणि शाळा सुधार आराखडय़ाला' शाळा सिद्धी ' नाव देण्यात आले आहे.
शाळेच्या परिणामकारक कामगिरीसाठी सामर्थ्य स्रोत निर्णायक आहेत. उपलब्ध स्रोतांचा महत्तम वापर सुरक्षा हेल्थ उच्च दर्जा राखत पोषक वातावरणात अध्ययन घडून येण्यासाठी होणे आवश्यक आहे. अशी माहिती या वेळी मान्यवरांनी दिली. या वेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री नानाभाऊ हजारे व ईतर मान्यवर उपस्थित होते.
Add new comment