आ.मेटेंनी शब्द पाळला; मुख्यमंत्री उद्या नारायणगडावर

बीड (प्रतिनिधी) शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी नारायणगडाच्या सर्वांगिण विकासाचा शब्द पाळला असुन २५ कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या नारायणगडावर होत आहे. यावेळी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांच्या प्रयत्नातून नारायणगडाच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याठिकाणी विविध विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असल्याचा शब्द आ.मेटे यांनी दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते २५ कोटींच्या कामाचा भूमीपूजन समारंभ उद्या दि.१५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. दरम्यान दुपारी होणार्‍या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उद्या सकाळी बीड शहरामध्ये भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून शिवसंग्रामचे कार्यकर्ते त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.