दिंद्रुड येथे सोळा लाखाचा गुटखा पकडला डिवायएसपी भाग्यश्री नवटक्केंची सिंघम कारवाई

बीड (प्रतिनिधी) जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी व्यापक मोहिम राबवली आहे. यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी तीन वाजता बेंगलोरहून गुटखा घेवून बीडकडे निघालेल्या ट्रकला दिंद्रुड येथे डिवायएसपी भाग्यश्री नवटक्के यांच्या टीमने ताब्यात घेत सोळा लाख पन्नास हजार रूपयाचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणाने अवैध गुटखा विक्री करणार्‍या खळबळ माजली आहे.
बेंगलोर-गुलबर्गा मार्गे परळीहुन बीडकडे येणार्‍या ट्रक क्र.(एम.एच४३ ७२९७) या गाडीमध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती डिवायएसपी भाग्यश्री नवटक्के याना मिळाली होती. सकाळी तीन वाजेच्या दरम्यान सदरिल ट्रक दिंद्रुड शिवारात आला असता नवटक्के यांच्या टीमने ट्रक ताब्यात घेतला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोण्यामध्ये भरून गुटखा ठेवला असल्याचे निदर्शनास आले. सदरिल गुटखा सोळा लाख पन्नास हजार रूपयापेक्षा जास्त किमतीचा असल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा गुटखा कोणी पाठवला याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ट्रक मालक अजित रहाने उर्फ सुल्तान (रा.लातूर) यांचे या प्रकरणात नाव पुढे येत आहे. सकाळी केलेली कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. सदरिल ट्रक दिंद्रुड पोलिस ठाण्यात सिसीटीव्ही कॅमेर्‍याच्या निगराणीखाली लावण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी डिवायएसपी भाग्यश्री नवटक्के या करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.