पुणे, मुंबई पाठोपाठ आता अमळनेर शहरातही प्लास्टिकची अंडी आढळून आली
जळगाव (प्रतिनिधी)
चीनने प्लास्टिकच्या अंड्याची निर्मिती करून भारतीय बाजारपेठेत आणली आहेत. पुणे, मुंबई पाठोपाठ आता अमळनेर शहरातही प्लास्टिकची अंडी आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा आमदार शिरीष चौधरी यांनी आज (शनिवार) केला आहे.
आमदार कार्यालयातील कर्मचारी संग्राम पाटील (रा.केशव नगर) यांनी एका किराणा दुकानातून 24 अंडी विकत घेतली होती. त्यापैकी 6 अंडी ही प्लास्टिकचे निघाली. अंडी उकळून घेतल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
जळगावचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही. अखेर या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,पालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
होऊ शकतात पोटाचा विकार...
प्लास्टिकची अंडी सेवन केल्यामुळे पोटाचे आजार उद्भवू शकतात. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.
Add new comment