अंबाजोगाई पोलिसांनी दोन दारूभट्ट्या केल्या उध्वस्त हजारो रुपयांचे गुळमिश्रित रसायन केले नष्ट— अारोपी फरार
पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे याची कारवाई
अंबाजोगाई : अंबाजोगाई : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी कुरणवाडी परिसरातील वान नदीच्या पात्रातील बेकायदेशीर दारूभट्ट्यांवर कारवाई करत दोन भट्ट्या उध्वस्त केल्या आणि हजारो लिटर रसायन नष्ट केले.
अनेकदा कारवाई करूनही पुन्हा एकदा कुरणवाडी परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी दारू निर्मिती सुरु असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे, कर्मचारी घोडके, सावंत, केकान, दौंड अनारूप, गुट्टे, शिंगारे यांनी शुक्रवार (दि. ०९) रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कुरणवाडी परिसरातील दोन बेकायदेशीर दारूभट्ट्यावर छापा मारला. यावेळी एका भट्टीतील १० लोखंडी पिंपातील ४१ हजार रुपये किमतीचे १,८०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले. परंतु. दारू निर्मिती करणारे चंदू तुकड्या साखरवाले, इबुक कासम गवळी, इस्माईलचंद गवळी आणि चंदू जुम्मा गवळी हे चौघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी लक्ष्मण अनारूपे यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला. तर, जवळच असलेल्या दुसऱ्या भट्टीवरही छापा मारत पोलिसांनी ७ लोखंडी पिंपातील २८ हजार ७०० रुपये किमतीचे १,२६० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले. या ठिकाणाहूनही दारूनिर्मिती करणारे राजू गंगा चौधरी, सुभान चंदू गवळी आणि लल्लू कासम गवळी हे फरार झाले असून पोलीस कर्मचारी पिराजी गुट्टे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Add new comment