ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे _नगर- बीड- परळी रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात ४२५ कोटीची भरीव तरतूद ;
२०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू_
बीड दि. ०८ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नगर- बीड- परळी रेल्वेमार्गासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२५ कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरून २०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंडे भगिनी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
नुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्यातील २५ रेल्वे प्रकल्पांसाठी २४४६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात नगर-बीड-परळी मार्गाला ४२५ कोटी रूपये मिळाले आहेत. अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाला भरभरून निधी उपलब्ध झाला आहे.
वेगाने काम सुरू
---------------------
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले बीडच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकल्पात लक्ष घातले आहे. २६१ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी २८०० कोटी रू लागणार असून केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे याचा खर्च उचलत आहेत. सध्या या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मार्च २०१७ मध्ये नगर ते नारायणडोह या साडे बारा किमी दरम्यान कामाची चाचणी सात डब्यांची रेल्वेही धावली होती. आता कामाचा वेग पाहता लोणी ता. आष्टी पर्यंत रूळ अंथरण्याचे काम पूर्ण झाले असून बीड पर्यंत १२० किमी रेल्वे लिकिंग म्हणजे रूळ अंथरण्याची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा मार्च अखेर सोलापूरवाडी पर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता आहे. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया रेल्वे अधिकारी व जिल्हा प्रशासनाशी या कामाविषयी सातत्याने संपर्कात आहेत. एकूणच या रेल्वे मार्गावर सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता २०१९ मध्ये रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे.
•••••••
Add new comment