_बी फार्मसी महाविद्यालयातील रक्तदान शिबीरात 35 विद्यार्थ्यांचे रक्तदान
----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी महाविद्यालय अंबाजोगाई येथे फार्मा विक व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही रक्तदान शिबीराचे दि.5 फेब्रुवारी,सोमवार रोजी
आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन बी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस.तौर, डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर.तरके व अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एन.फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबीरच्या प्रारंभी बोलताना प्राचार्य डॉ.एन.एस.तौर यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन केले.तर प्राचार्य डॉ.एन.एन.
फुलारी यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले.या रक्तदान शिबीरामध्ये एकुण 35 विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी यांनी सर्व सहभागी विद्यार्थी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.रक्तदान शिबीराच्या यशस्वितेसाठी स्वाराती रक्तपेढी विभागाने सहकार्य केले.तर बी फार्मसी महाविद्यालयाने पुढाकार घेतला.
-----------------------------
Add new comment