दारुबंदीसाठी महिलांचा पुढाकार ; पोलीसांना निवेदन.

बीड (प्रतिनिधी) : तालुक्यातील वासनवाडी येथे दारुबंदी करावी या मागणीसाठी महिलांनी पुढाकार घेतला असून एकल महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली  शिवाजीनगर चे पी.आय. लाकाळ,व ग्रामीण पोलिस ठाण्याचे ए. पी.आय. बल्लाळ यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

वासनवाडी ही बीड शहरापासून जवळ आहे. या ठिकाणी सर्रास दारु विक्री होत असून दारुने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दारु पिणारे लोक घरी आल्यानंतर मुला, मुलींना तसेच महिलांनाही मारहाण करीत असतात. यामुळे संपुर्ण कुटुंबासह शेजाऱ्यांना सुध्दा त्रास होत असतो. यापूर्वी सुध्दा अनेक वेळा बैठक घेवून दारु बंदीसाठी प्रयत्न केले मात्र दारुबंदी होवू शकली नाही. त्यामुळे महिला, मुलांना होणारा त्रास कमी झाला नाही. आर्थिक आणि सामाजिक नुकसान होण्याचे कारण दारु ठरत असताना ती बंद का करु नये असा सवाल उपस्थित करुन पोलीसांनी दारुबंदी करावी करावी अशी मागणी एकल महिला संघटना व एकता महिला संघटनेच्या रुक्मीण नागापुरे, कौशल्या कळसुले, अनिता राऊत, कल्पना वखरे, मंगल कानाडे, वर्षा मोहलकर, छाया जाधव, शिवकन्या खरसाडे, स्वाती आनेराव, जयश्री पवार, सोजरबाई जाधव सह आदींनी केली आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.