राजकारण, समाजकारणात विधाते दांम्पत्याच्या कर्तृत्वाला झळाळी

बीड (प्रतिनिधी) राजकारण असो की समाजकारण त्यामध्ये विलास विधाते आणि त्यांची पत्नी जयश्री विधाते यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. अल्पावधीत विधाते दांम्पत्याच्या कर्तृत्वाला झळाळी मिळाली ती त्यांच्या नेतृत्व गुणावरच. सामान्य जनतेत मिसळणारे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणारे विधाते दांम्पत्य केवळ शहरात नव्हे तर जिल्ह्यातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. विलास विधाते यांच्यासह जयश्री विधाते यादेखील सक्रिय राजकारणात असुन सध्या महिला व बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
बीड शहरातील राजकारण आणि समाजकारणात विलास विधाते यांचे नाव प्राधान्याने समोर येते. २००१ च्या नगरपालिका निवडणूकीपासून राजकारणात सक्रिय होणार्‍या विलास विधातेंना जनमताचे पाडबळ सातत्याने मिळाले. नगर पालिका निवडणूकीपासून सक्रिय झाल्यानंतर विलास विधाते यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यांना साथ मिळाली ती पत्नी जयश्री विधाते यांची. दोघांनीही राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिल्यानेच जनसामान्यांच्या मनामध्ये त्यांनी आपले अलौकीक स्थान निर्माण केलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून काम करतांना विलास विधाते यांनी पक्षीय संघटन बांधणीला महत्व देत तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय दिला. नगर पालिकेच्या माध्यमातून प्रभागासह शहरातील इतरही समस्या हाताळून त्यास न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न शहरवासियांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. विलास विधाते यांच्या पाठोपाठ पत्नी जयश्री विधाते यांनीही राजकारणात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. स्वच्छता सभापती म्हणून काम करत असतांना त्यांनी ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवली. त्यांच्यामुळे शहरातील महिला संघटनही वाढले. बचत गटांना बळ देण्याचे काम जयश्री विधाते यांनी केले. विधाते दांम्पत्यांनी राजकारणासह समाजकारणात केलेले कार्य उल्लेखनीय असून अल्पावधीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. जातीधर्माला थारा न देता छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांना अभिप्रेत समाज घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असुन त्याच विचाराने प्रेरीत होवून त्यांचे कार्य सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीला, कार्यकर्त्याला त्याच विचाराने जवळ करण्याची विधाते यांची कला हीच त्यांची हातोटी ठरलेली आहे. या सर्व शब्दप्रपंचाचे निमित्त म्हणजे आज विलास विधाते यांचा वाढदिवस असून त्यांना उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा..!

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.