रमाई आवास बीपीएलसह एपीएल धारकांनाही द्यावेत संजय होळकर यांची मुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्र्याकडे मागणी
बीड (प्रतिनिधी) रमाई आवा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रारत मागासवर्गीय बीपीएल धारकांना घरकुल (घर) बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते ही योजना गेल्या काही वर्षापासून नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत मार्फत समाज कल्याण विभागाच्यावतीने राबवण्यात येत असुन बीपीएल धारक मागासवर्गीयांना तर या योजनेचा लाभ मिळणे गरजेचेचे आहे. परंतू त्यासह अनेक गरीब व सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंब हे बीपीएल मध्ये आलेले नसून ते एपीएल मध्ये आहेत. अशा बेघर कुटूंबांना देखील नियमानुसार रमाई आवास योजने अंतर्गत घर बांधणीसाठी अनुदान देता येते असे संजय होळकर यांनी म्हटले असून गेल्या काही वर्षापासून अत्यंत धिम्या गतीने फक्त बीपीएल धारक कुटूंबांचेच रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज मागवून ते स्वीकारून त्यातील पात्र कुटूंबांना घरकुल मंजूर केले जाते. परंतू यात एपीएल धारक मागासवर्गीय या योजनेपासून वंचीत राहत असल्यामुळे संजय बाबुराव होळकर यांनी त्या बाबत वारंवार संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे मागणी केली असून दि.२९-१-२०१८ रोजी मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन संजय होळकर यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेवून बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बीपीएल धारक ममागासवर्गीयांसह एपीएल धारक सर्व मागासवर्गीयांचे देखील रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज मागवावेत व ते अर्ज स्विकारून नियमानुसार बीपीएल सह एपीएल धारक मागासवर्गीय देखील घरकुल मंजूर करून अनुदान द्यावे करीता संबंधीत विभाग व अधिकार्यांना सुचना द्याव्यात अशी मागणी संजय होळकर यांनी करून लेखी निवेदन दिले असता सदरील मागणी रास्त व योग्य असल्याचे मुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्र्यांनी मान्य केले व तात्काळ प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना तशा सुचना देण्याचे आदेश मुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्र्यांनी मंत्रालयीन अधिकार्यांना दिले. त्यामुळे लवकरच बीपीएल धारक मागासवर्गीयांसह एपीएल धारक मागासवर्गीयांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणार असल्याचे संजय बाबुराव होळकर यांनी म्हटले आहे.
Add new comment