गूढ आवाजाने बीड शहर हादरले

बीड

बीड शहरासह जवळपासची खेडी मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास गूढ आवाजाने हादरली. तावदाने, खिडक्यांच्या काचाचा थरकाप झाला. यामुळे भयभीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

आज सकाळी बीड शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दैनंदिनं काम सुरू झाली आणि साधारण ८:५७ मिनिटांनी अचानक झालेल्या गूढ आवाजाने बीड हादरले. बीड शहरासह जवळपासची खेडी ही या आवाजाने हादरून गेली, खिडक्यांच्या काचाचा थरकाप प्रकर्षाने जाणवला. काय झाले या भीतीने प्रत्येकजण घरा बाहेर पडत होते, नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी एकमेकांना संपर्क करू लागले. मात्र कुणाकडेच याची माहिती मिळत नव्हती.

गेल्या दोन तीन वर्षांपासून अधूनमधून असे गूढ आवाज येण्याच्या घटना सुरू आहेत. भूगर्भात होणाऱ्या आवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या गूढ आवाजाची अद्याप पर्यंत प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.