मंत्री राम शिंदेंच्या जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्था ढासळली

गोळीबाराच्या निषेधार्थ मुकमोर्चा; पोलिस ठाण्याला सक्षम अधिकारी देण्याची मागणी
जामखेड (प्रतिनिधी) दि.१ फेब्रुवारी रोजी जामखेडच्या पंचायत समिती कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातील राजकीय वादातून गुंडांच्या टोळीकडून भरदिवसा गोळीबार करत जामखेड शहरात दहशतीचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच डॉक्टरसह मेडिकल दुकानदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या निषेधार्थ जामखेडकर जनतेच्या वतीने एकत्र आज मुक मोर्चा काढत निषेध नोंदविला.
जामखेड गोळीबारसह अन्य घटनांनी  जामखेडची कायदा व सुव्यवस्था पुरती ढासळल्याचे स्पष्ट होते आहे. कायद्याची भीती कोणालाही उरली नाही. जामखेडची कायदा सुव्यवस्था ढासळण्याचे काम सातत्याने तालुक्याच्या बाहेरचे लोक स्थानिक गुंडाना हाताशी धरून करत आहेत. जामखेड पोलिस स्टेशनला कायम व सक्षम आधिकारी नाही. शहरासह तालूक्यात भीतीदायक वातावरण निर्माण करून शहराची शांतता भंग करणार्या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी मोर्चेकर्यांनी केली. गोळीबार घटनेचा निषेध म्हणून जामखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या वतीने दि.६ फेब्रुवारी रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत. तहसीलदार, पोलीस निरीक्षक व प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मंगळवार दि.६ रोजी दुपारी १ वा इदगाह मैदान शासकीय गोडाऊनाजवळुन हा मूक मोर्चा काढण्यात आला. तो बसस्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड रोड कार्नर मार्गे तहसील कार्यालयावर शांतता मय रितीने पोहचला मोर्चामधील नागरिकांच्या हातात मी जामखेडकर शांतता हवी, गावातील दहशत संपवा, गूंडगिरी मूक्त जामखेड करा, दहशत भय नको शांतता हवी. असे फलक नागरिकांच्या हातात होते. डॉ.सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर उघड उघड गोळीबार करून जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा व कायदा सुव्यवस्था ढासळल्याच्या निषेधार्थ समस्त जामखेडकरांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना सर्वांनीच जामखेड तालुक्यातील दहशतीचा निषेध व्यक्त केला. तहसील प्रशासनाने मूक मोर्चा येणार म्हणून तहसील कार्यालयाच्या मूख्य गेटला कूलूप लावले.
 
पाटोद्यामध्येही गोळीबाराचा निषेध; सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
जामखेड येथे डॉ.सादेक पठाण आणि नाळवंडी (ता.पाटोदा) येथील जानुलाल पठाण यांच्या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाटोद्यात तहसिलदारांनी निवेदन देण्यात आले. गोळीबार आणि हल्ला करणार्‍या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.