लाइव न्यूज़
कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन
Beed Citizen | Updated: February 6, 2018 - 2:58pm
बहुसंख्येने सहभागी व्हा-भगवान कांडेकर, धर्मपाल ताकसांडे, रविंद्र मांडवे, सुनिल निर्भवणे यांचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) शासनाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब राज्य कर्मचारी संघटनेने आंदोलन उभारले असून दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान महाराष्ट्रातील विभागीय कार्यालयावर निदर्शने होणार आहेत. दि.२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयावर एल्गार मोर्चा निघणार असुन या आंदोलनामध्ये कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष भगवान कांडेकर, कार्याध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, कोषाध्यक्ष रविंद्र मांडवे, सरचिटणीस सुनिल निर्भवणे यांनी केले आहे.
कामगार करार त्वरीत करा, मागासवर्गीय कर्मचार्यावरील अन्याय दुर करा, एसटी महामंडळाचे खाजगीकरण करू नका, पदोन्नतीतील आरक्षण विधेयक लोकसभेत पास करा आदि मागण्यांसाठी ढोल बजाव शासन जगाओ आंदोलन करण्यात येणार असुन या आंदोलनामध्ये राष्ट्रीय परिवहन कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे नेते भगवान कांडेकर यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे. निदर्शने एल्गार मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कांडेकर यांनी सांगितले आहे.
Add new comment