वित्त मंत्र्याकडून बीड जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 चा आढावा
बीड दि. 5 : बीड जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2018-19 चा प्रारुप आराखडा 223 कोटी असून अतिरिक्त मागणी 88 कोटीची आहे. याबाबतचा सविस्तर आढावा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी औरंगाबाद येथे घेवून देण्यात येणार वाढीव निधी आरोग्य, शिक्षण व जलसंधारणाच्या कामावर मोठयाप्रमाणात खर्च करण्याची सूचना केली.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात मराठवाडा विभागातील सर्व जिल्हयातील जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 चा आढावा घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या आढावा बैठकीस आमदार भिमराव धोंडे, विभागायी आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवाणे यांच्यासह यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थिती होते.
यावेळी बोलतांना वित्त मंत्री मुनगुंटीवार म्हणाले की, बीड जिल्हा वार्षिक योजनेच्या 315 कोटी 36 लाख 13 हजार रुपयांच्या प्रारुप आराखडयात सर्वसाधारण योजनेसाठी 223 कोटी 70 लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 89 कोटी 60लाख रुपये आणि आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 6 लाख 13 हजार रुपये प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला असून अतिरिक्त मागणी केलेल्या 88 कोटी 98 लाख 74 हजार रुपयाची आहे. अतिकरक्त मागणी केलेल्या निधीतून पशुसंवर्धनसाठी 5 कोटी, वन विभागासाठी 3 कोटी, सहकार 5 काटी, नगर विकास 4 कोटी, लघुपाट बंधारेसाठी 4 कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी 57 कोटी 48 लाख 74 हजार, शिक्षण 7 कोटी, तंत्र शिक्षण 50 लाख, आरोग्य 2 कोटी तर उर्जासाठी 1 कोटी रुपयाची कामे करण्यात येणार आहेत असे सांगून बीड जिल्हयास 13 लाख 50 हजाराचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असतांना जिल्हयाने 17 लाख 30 हजार वृक्षाची लागवड केली तर यावर्षी 33 लाख वृक्ष लागवड करणार असल्याने बीड जिल्हयातील वृक्ष लागवड कार्यक्रमाचे वित्त मंत्र्याकडून यावेळी कौतुक करण्यात आले आहे.
Add new comment