पत्नीच्या खुन प्रकरणी येरमाळ्याच्या एपीआय विरुद्ध गुन्हा पत्नीची आत्महत्या नसुन हत्याच
येरमाळा (उस्मानाबाद) : सहायक पोलिस निरिक्षक विनोद चव्हान यांना त्यांच्या पत्नीच्या आत्महत्ये प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कलम 302,498(ब),34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार दि.२५ जानेवारी रोजी येरमाळा पोलिस ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या पत्नीने पोटात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची खळबळजणक घटना घडली होती. दिनांक २६ जानेवारी रोजी मयत मोनाली चव्हाण यांचे सोलापूर येथे शवविच्छेदन करुन बीड या ठिकाणी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर झालेला तपास व त्याचा खुलासा गंभीर असून अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. मोनाली चव्हाण यांची आत्महत्या नसून पती विनोद चव्हाण याने खुन केला असल्याची फिर्याद मयत मोना चव्हाण हिचे वडील शेषांक जालिंदर पवार (वय ४९ हेड कॉन्स्टेबल शिरुर कासार ता.जि.बीड) यांनी येरमाळा पोलिस ठाण्यात रात्री ११.वाजेच्या सुमारास दिली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मोना चव्हाण यांचे वडीलही पोलिस नोकरीत कार्यरत असून त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. मोना यांचे लग्न जमवितेवेळी चव्हाण यांच्याकडून १४ लाख हुंडा व ७ तोळे सोन्याची मागणी करण्यात आलेली होती.एवढी रक्कम देणे शक्य नसल्यामुळे मोना यांनी स्पष्ट नकार दिला होता मात्र गडचिरोली येथे बॉम्ब निकामी करतेवेळी हात भाजला होता.म्हणून भेट देण्यासाठी मोना यांचे आईवडील चौसाळा येथे गेले होते त्यावेळी चव्हाण यांचे नातेवाइकांनी ७ लाख हुंडा आणि ५ तोळे सोने देण्याची मागणी केली.मात्र ऐपत नसल्यामुळे दोन लाख व दीड तोळ्याची सेान्याची चैन व एक तोळ्याची अंगठी देवून बाकी राहिलेले हुंड्याचे पैसे आमच्याकडे आल्यानंतर देवू असे ठरले होते. त्यानंतर दि.२८.११.२०१४ रोजी मोना व विनोद यांचा बौद्धपध्दतीने विवाह लावून दिला.लग्नानंतर एक दोन महीने चांगले वागविले नंतर मात्र हुंड्याच्या पैशासाठी लहान सहान गोष्टीवरुन सतत मानसिक त्रास देवू लागले.सातत्याने माहेरी आणून सोडणे,आजारी असतानाही औषध उपचार न करणे अशाप्रकारची वागणूक मोनाला दिली जात असल्याची माहिती पवार यांनी दिली. दिनांक २४.१.२०१८ रोजी मोनाली यांचे पती विनोद चव्हाण हे औरंगाबाद येथे कामानिमित्त गेलेले होते.ते रात्री ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान घरी परत आले.त्यावेळी मोनाली यांच्या मोबाईलवर २ वेळेस कॉल करुनही घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्याबरोबर भांडण केले.ही सर्व माहीती मोनाली हिने तिच्या आईला दि.२५.१.२०१८ च्या सकाळी ९.वाजता मोबाईलव्दारे सांगितली. त्यानंतर आईने मोनाली यांची समजूत घालून मोबाईल बंद केला व नंतर ९ वा.१७ मि.मोनाली हिला कॉल केला असता मम्मेव असा अवाज येत होता. यावरून मोनाली हिचा पती विनोद याने हुंड्यातील राहीलेले पैसे व सोने आणीत नाही आणी तिच्या चारित्र्यावर संशय घेवून त्याच्या सर्व्हीस रिव्हॉल्वर मधून सकाळी ९.१७ वा.मोनाली हिच्या छातीत गोळी झाडून ठार मारले आहे.तसेच विनोद याने आम्हाला या घटनेबाबत माहीती दिली नसल्याचेही फिर्यादीत नमुद करण्यात आलेले आहे. या प्रकरणी पती विनोद बापू चव्हाण ,सासरा बापू लाला चव्हाण , सासू विमल बूप चव्हाण,चुलत सासू निर्मला शिवाजी चव्हाण ,चुलत सासरा शिवाजी लाला चव्हाण , या सासरकडील मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक व शारिरिक छळ करुन तिला ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपविभागिय अधिकारी नितिन कटेकर हे करीत आहेत.
Add new comment