जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीधरराव गित्ते यांचे निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा श्री जगमित्र नागा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीधरराव गित्ते पाटील यांचे आज रविवार दि.04 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा वृध्दापकाळाने
राहात्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षोचे होते.आज दुपारी त्यांच्यावर टाळ, मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीधरराव गंगाराम गित्ते रा.वाघबेट, ता.परळी वैजनाथ जि.बीड, ह.मु.बँक काँलनी परळी वैजनाथ यांचे आज रविवारी निधन झाले.जुन्या पिढीतील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी, बँरिस्टर अँड.ए.आर.अंतुले यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. श्री जगमित्र नागा शिक्षण संस्थेचे तथा जवाहर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष,अंबाजोगाई पंचायत समितीचे उपसभापती व श्री जगमिञ मंदिराचे वि्श्वस्थ पद ही त्यांनी भुषविले आहे. या काळात त्यांनी
विविध शैक्षणीक सुधारणा व वैद्यनाथ महाविद्यालयात त्यांनी अनेक आधुनिक तंञज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थी पालक व शिक्षकामध्ये व परळी शहर व तालुक्यात ते सर्व परिचित होते. परळी वैजनाथ व अंबाजोगाई तालुक्यातील विविध विकास कामे त्यांनी केले. बीड लोकसभा निवडणुक लढविली होती त्यामुळे ते देशभरात चर्चेत आले होते.
कै.श्रीधरराव गंगाराम गित्ते पाटील हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने परळी व अंबाजोगाई तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीधरराव गित्ते पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी,तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
कै.श्रीधरराव गंगाराम गित्ते यांच्या पार्थिवावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या या अंतयात्रेत सर्व स्तरातील नागरिक डॉक्टर, व्यापारी, पत्रकार, वकील, पोलीस कर्मचारी व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कै.श्रीधरराव गित्ते यांच्यावर कोसळलेल्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment