लाइव न्यूज़
धनंजय देसाई याने दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
Beed Citizen | Updated: February 3, 2018 - 3:57pm
इंजिनीअर मोहसीन शेख याच्या खुनाप्रकरणी अटकेत असलेल्या हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याने दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.
पुणे : हडपसर भागात झालेल्या दंगलीत सॉफ्टवेअर इंजिनीअर मोहसीन शेख याच्या खुनाप्रकरणी अटकेत असलेल्या हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्षधनंजय देसाई याने दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.हडपसरमध्ये दोन जून २०१४ला दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा मृत्यू झाला होता. मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेखने फिर्याद दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाईसह इतर २० जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १९ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात देसाई याचा प्रत्यक्ष सहभाग नाही. केवळ भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. त्याबाबत वेगळा गुन्हा दाखल आहे. ज्या दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी ते पुण्यात नव्हते. त्यामुळे त्यांना या खटल्यातून वगळ्याबाबत बचाव पक्षाने हायकोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर हायकोर्टाने सत्र न्यायायालयात देसाईवर सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत हायकोर्टातील देसाईच्या याचिकेवर सुनावणी होत नाही. तोपर्यंत सत्र न्यायालयाने खटला चालवू नये, असा आदेश हायकोर्टाने दिला. त्यानंतर देसाईने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या १९ जणांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे देसाईला जामीन देण्यात यावा, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार, अॅड. भालचंद्र पवार यांनी कोर्टात दाखल होता. ही घटना गंभीर असल्याचा निष्कर्ष काढून कोर्टाने देसाईचा अर्ज फेटाळला.
Add new comment