भोजगावचे उपसरपंच विक्रम संत,माजी सरपंच संदिपान संत यांच्यासह असंख्य युवकांचा बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
गेवराई ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भोजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच विक्रम संत, माजी सरपंच संदिपान संत यांच्यासह असंख्य युवकांनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली व जि.प. सभापती युधाजित पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
दि १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भोजगाव येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यास हभप रघुनाथ महाराज निंबाळकर, पं. स.सदस्य महादेव औटी, दादासाहेब संत, प्रवक्ते दिनकर शिंदे, सरपंच अशोक वंजारे, युवराज जाधव, नवनाथ पारे, मधुभाऊ आहेर, संदिपान पट्टे, भागवतराव ढेंबरे, अनिरुद्ध सोलाट, शौकतभाई, राजाभाऊ जाधव, भैय्यासाहेब नाईकवाडे, संतोष दिलवाले, संतोष धस, गणेश आहेर, बाबासाहेब गव्हाणे, अतुल आहेर, पाराजी साखरे, देवा कापसे, बंडू बावचकर, बदाम पौळ, किरण आहेर, मुक्ताराम आव्हाड, प्रभाकर शिंदे, भरत मोहिते, सोमनाथ गिरगे, संदीप निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना सभापती युधाजित पंडित म्हणाले की, लोकांचा विश्वास असल्यानेच बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज तालुक्यातील प्रत्येक गावातील युवक मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. तालुक्यात दोन आमदार आहेत मात्र लोकांच्या अडचणीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. आबा आमदार नसतानाही तालुक्यातील विकास कामे खेचून आणत आहेत. पालकमंत्री ना पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाला आपण मंजुरी घेतली आहे. लवकरच सदर रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील असे सांगून बदामराव पंडित आमदार नसल्याने आणि चुकीचे माणसं निवडून घेल्याने, विकास कामांच्या बाबतीत किती अडचणी येतात हे आता कार्यकर्ते आणि गेवराईकरांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आता गट तट विसरून सर्वांनी एकोप्याने सेना वाढविण्याच्या कामाला लागावे आणि विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकवावा असे आवाहन युधाजित पंडित यांनी केले आहे. महादेव औटी, दिनकर शिंदे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास माजी सरपंच हरिभाऊ संत, संभाजी शिंदे, रवींद्र शिंदे, सतीश संत, ज्ञाणेश्वर गिरे, दीपक शिंदे, गणेश दातार, विकास संत, राहुल पंडित, गोविंद दातार, सतीश थिटे, दादा जाधव, सचिन पंडित, भरत दातार, ज्ञाणेश्वर थिटे, अशोक शिंदे, प्रभाकर सागडे, प्रकाश संत, भुपेंद्र संत, ग्रा.पं.सदस्य कैलास शिंदे, मुक्ताराम दातार, कचरू जाधव, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुदर्शन संत यांनी केले तर नावडे सर यांनी सर्वाचे आभार मानले.
Add new comment