श्री एकता मित्र मंडळाचे सामाजीक काम इतरांसाठी आदर्श ठरेल - अॅड देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) बीड शहरात श्री एकता मित्र मंडळाने 'आनंद द्या - आनंद घ्या - आनंदी रहा' हा आपला उद्देश चांगलाच जपला आहे. मंडळाने जिल्हा स्टेडियम वर चालण्या फिरण्याच्या व्यायामाबरोबरच सामाजीक उपक्रमात चांगला सहभाग नोंदवला आहे. आता आणखी जादा सहभाग नोंदवून जिल्ह्याला एक नवा पायंडा पाडून द्यावा. मंडळाचे काम इतरांसाठी आदर्श ठरेल, असे मत जेष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
मंडळ सहाव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने मंडळाने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन अँड. देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मंडळाने स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड आणि संवर्धन, वस्तीगृहाला साहित्य वाटप, स्टेडियम गॅलरी स्वच्छता आणि सहल काढून आनंद लुटला आहे. हे एक वेगळे काम असून अशा कामातून समाज जागृती होत असते. दुसऱ्यांनी आदर्श घेऊन कामाला लागावे, असा हा पायंडा असतो. सकाळी फिरण्यासाठी एकत्र येताना त्यानंतर विचारांचे आदान प्रदान करत काही काम करणे,म्हणजेच देश आपला आहे, आपणही देशाचे देणे लागतो, हे दाखवून देणे आहे. निश्चितच हा आदर्श जिल्ह्यात काही लोक घेतील. असे देशमुख म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक विजय गोरे यांचा वाढदिवस आणि मंडळ सहाव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने मंडळाचे उपाध्यक्ष अँड. रवींद्र कुकडगावकर यांच्या बीड लगत असलेल्या शेतीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विजय गोरे यांनी मंडळाच्या कामाचा आढावा आपल्या भाषणातुन समोर मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय गोरे
तर प्रमुख उपस्थिती मंडळाचे जेष्ठ सदस्य तोडकर अप्पा सचिव शेख कय्युम यांची होती. यावेळी लक्ष्मणराव गुजर, गोरख कोकाटे, प्रकाश कायदे, भालचंद्र तकीक, पारस लुनावत, वसंतराव पडुळे, राजेंद्र सुरवसे, रमेश कात्रेला, घनश्याम टेकवानी, चांदूलाल जालनेकर, प्रभाकर कुलकर्णी, प्रताप कदम, नजीर सर, अनिल सुरडकर, जनार्दन शिंदे यांचेसह अन्य सदस्य हजर होते.
मंडळाचे सदस्य काकासाहेब दळवी यांनी उत्कृष्ट सूत्र संचलन केले. तर नंदकुमार गुळजकर यांनी आभार प्रदर्शन

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.