भाजपा भ्रमनिरास पार्टी-घोळवे

बीड जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार
शिवसेनेकडून नव्हे तर भाजपकडूनच गडाचे राजकारण-घोळवे
बीड (प्रतिनिधी) शेतकरी, कामगार, नौकरदार आणि बेरोजगार सर्वचजण सरकारवर नाराज आहेत. भाजप सरकार हुकूमशाही पध्दतीने काम करत असल्याचा आरोप करत भाजपा ही भ्रमनिरास पार्टी असल्याची टिका शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी केली. बीड जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट करत शिवसेनेकडून नव्हे तर भाजपच गडाचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
बीड येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, विलास महाराज शिंदे, नितीन धांडे, चंद्रकांत नवले आदिंची उपस्थिती होती. यावेळी घोळवे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. गावागावात त्या दृष्टीने संघटनबांधणी सुरू असून प्रत्येक ठिकाणी शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. ४ फेब्रुवारीपासून राज्यभर संघटन बांधणीच्या दौर्‍याला सुरूवात होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष असुन मुस्लिम विरोधी नाही. राष्ट्रभक्ती हिच शिवसेनेची ओळख असुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची भुमिका शिवसेना बजावत असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारवर टिका करत हुकूमशाही पध्दतीने सरकार चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ऑनलाईन सरकारला ऑफलाईन करण्याची वेळ आली असुन राज्याची जनता निवडणूकीची वाट बघते. येणार्‍या दिवसात शिवसेना सत्तेवर येईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रामविकास मंत्री पंकजाताई आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत मात्र मला शिवसेना पक्ष वाढवायचे असल्याचे ते म्हणाले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.