लाइव न्यूज़
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचार्यांचा मुकमोर्चा पाल्यांना पोलिस बॉईज म्हणून सवलतीची मागणी
Beed Citizen | Updated: February 2, 2018 - 3:07pm
बीड (प्रतिनिधी) सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी सेवा समितीच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. निवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना ते हयात असेपर्यंत शासकीय कुटूंब आरोग्य योजना लागु करण्यात यावी, पाल्यांना भरतीमध्ये १५% पोलिस बॉईज म्हणून सवलत मिळावी आदि मागण्यांचे निवेदन समितीने जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज दुपारी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी सेवा समितीच्यावतीने मुकमोर्चा काढण्यात आला. हातात विविध मागण्यांचे फलक घेवून जिल्हाकचेरीसमोर दाखल झालेल्या निवृत्त अधिकारी, कर्मचार्यांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. शासकीय कुटूंब आरोग्य योजना लागु करण्यात यावी, शासकीय अधिकारी-कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागु करावा, पोलिसांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून अन्य विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना सणाच्या व इतर दिल्या जाणार्या त्या सुट्यांचा मोबदला देण्यात यावा, हल्ले करणार्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येवून गुन्हेगारांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणार्यांना सहआरोपी करावे, स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणार्यांविरूध्द कडक कारवाई करावी आदि मागण्यांचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष संतराम घोडके, उपाध्यक्ष शेन अन्वर, सचिव बाबासाहेब सरवंदे, धनंजय महाजन, खाजा पाशा, रोहिदास घोडके, ज्ञानोबा ठोंबरे, रावसाहेब बावळे, चंद्रकांत कोल्हे आदिंची उपस्थिती होती.
Add new comment