आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम
अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय.
मुंबई- अवकाशातील घटना या मनुष्यासाठी नेहमीच कुतूहलाच्या असतात. आकाशात सुपरमून, ब्लुमून आणि ब्लडमून पाहण्याचा त्रिवेणी संगम आज जुळून आलाय. 31 जानेवारी 2018 म्हणजेच आज अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळतोय. चंद्र हा आज पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 58 हजार किलोमीटर अंतरावर आला आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा तर 30 टक्के अधिक तेजस्वी दिसतोय. विशेष म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्हाला चंद्र पाहायला मिळतोय. 31 मार्च 1866 नंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 152 वर्षांनी असा योग जुळून आलाय. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठं दिसतंय.
Add new comment