लाइव न्यूज़
शिक्षीका सय्यद जरीना यांना पुरस्कार
Beed Citizen | Updated: January 31, 2018 - 3:20pm
बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील चौसाळा केंद्राअंतर्गत पिंपळगाव घाट जि.प.शाळेतील शिक्षीका श्रीमती सय्यद जरीना बाबुलाल (शेख समीर) यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पिंपळगाव घाट येथील जिल्हा परिषद शाळेतील त्यांचे कार्य पाहून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्काराने सय्यद जरीना यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी पत्रकार वसंत मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सय्यद जरीना यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख शेख सपाटे, शेख फारूक, सुरवसे, आगलावे, तेलप आदिंसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
Add new comment