लाइव न्यूज़
पाटोदा नगर पंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नगरसेवकाचेच उपोषण

पाटोदा (प्रतिनिधी) येथील नगरपंचायत कार्यालयातील अनेक गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नगरसेवकानेच उपोषण सुरू केले आहे.
पाटोदा नगर पंचायत अंतर्गत विविध कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी येथील नगरसेवक सुभाष आडागळे यांनी आजपासून मुख्याधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसाचे उपोषण सुरू केले आहे. बेकायदेशीर तांत्रिक सल्लागार व स्थापत्य अभियंता यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी नगरपंचायत विरूध्द दंड थोपटले आहेत.
Add new comment