डॉ.आंबेडकर पुतळयाजवळील भिमसृष्टीचे काम 14 एप्रिल पुर्वीच - नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)ः- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात भिमसृष्टीचे काम येत्या 14 एप्रिल पुर्वी केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले आहे.
ज्येष्ठ नागरीकांच्या शिष्टमंडळाने आज नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची भेट घेऊन पेठ बीड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिमसृष्टीचे काम सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ नागरीकांनी सांगितले की, पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व विविध कार्यक्रमानिमित्त व त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमा होत असतो मात्र हा परिसर अपुरा पडतो. शहरातील अन्य पुतळ्यांजवळ सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसृष्टी तयार करण्यात आली आहे ही अत्यंत चांगली बाब असून शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रहदारीच्या दृष्टीने रस्त्यांचे रूंदीकरण करून चांगले रस्ते होऊ लागले आहेत. याबाबत शिष्टमंडळाने नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांचे अभिनंदन केले. याचबरोबर सध्या सुरू असलेल्या नाली बांधकामावर अनेक ठिकाणी झाकणे घालण्यात यावीत तसेच डॉ.आंबेडकर पुतळ्यास हार घालण्यासाठी मोठी सिडी बसवण्यात यावी तसेच या चौकातील अतिक्रमणे तात्काळ काढून हा संपूर्ण परिसर सिमेंट काँक्रिटचा करण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने केल्यानंतर नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्यांना बोलवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असल्यामुळे हे काम तत्पुर्वीच करण्याचे आदेश दिले आहेत. शिष्टमंडळात जि.के.जाधव, डी.एस.आठवले, आर.व्ही.गायकवाड, अनंतराव सरवदे, राणाप्रताप कदम, बी.एस.गायसमुद्रे, देवीदासराव जोगदंड, गौतम सोनवणे, जवंजाळ सर, उध्दव जोगदंड, अशोक भालेराव, गाडे सर, आर.एम.वाघमारे, एस.डी.निसर्गंध, दिनकर बोराडे, ए.व्ही.जोगदंड, एम.एस.डोंगरे, म.गो.वाघमारे, एस.एस.साळवे, एस.के.सेमाडे, मधूकर जावळे आदिंसह सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी व ज्येष्ठ नागरीक यांचा सहभाग होत
Add new comment