जुना बाजार, मोमीनपुरा विकासासाठी दोन्ही क्षीरसागर कधी भांडणार? -डॉ.हाशमी इद्रीस
बीड (प्रतिनिधी)- पुर्ण बीड शहरा मध्ये सध्या विकासाचे कामे सुरु आहेत. शासकीय दवाखाने व सुभाष रोडच्या कामासाठी व उद्घाटनासाठी काका पुतने एकमेकांशी भांडणे करत आहेत. श्रेय लाटत आहेत. परंतु जुना बाजार व मोमीनपुराच्या विकासाठी दोन्हीही क्षीरसागर कधी भांडरे करणार याची वाट या भागातील जनता पहात आहे. गेल्या तीन चार वर्षा पासुन जुना बाजार या मास्टर प्लॅन काम रेंगाळलेले आहे. आता मोमीनपुरा येथील रस्त्याचे काम तसेच जुनाबाजार सारखेच झालेले आहे. रस्त्यावर घान पाणी साचलेले आहे. खड्डयामध्ये साचलेल्या घान पाण्यामुळे या भागातील जनतेचे स्वास्थ्याला धोका निर्माण झालेला आहे. रस्त्यामध्ये सगळे खड्डी ही खड्डे झाले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना निट शाळेला जाता येता येत नाही. महिलांना जाण्या येण्याची अडचण होत आहे. हे किती दिवस अजुन चालणार आहे. हे बीडच्या विकास पुरूषाने बोलावे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी दोन्ही क्षीरसागर पुढे येतात परंतू त्याना जुना बाजार आणि मोमीनपुरा येतील लोकांचे हाल का दिसत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर या दोनी भागातील जनतेला नगर पालीका व बीडच्या नेत्यांना वेठीस धरल्यास जनता त्यांना सोडणार नाही आणि येत्या १५ दिवसात जर मोमीनपुरा व जुना बाजार नाल्या व रोडचे कामाला सुरुवात झाली नाही तर जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा आपल्या पत्रकात नगर सेवक डॉ.हाशमी यांनी दिला आहे.
Add new comment