सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव रुग्णांची सेवा वाऱ्यावर .!
सिरसाळा(प्रतिनिधी)तालुक्यातील सर्वात मोठे बाजार पेठ व32खेड्याचा नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आरोग्य केंद्र म्हणजे सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र होय याठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैर सोय होताना दिसत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सिरसाला सह परिसरातील32खेड्यातील लोक याठिकाणी उपचारासाठी येत आहे परंतु या ठिकाणी कधी डाँक्टर नसणे, डाँक्टर असलेतरी उपचाराला लागणारे गोळ्या औषध नसणे अश्या प्रकारच्या विविध सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणची आरोग्य सुविधा अडचण नसुनखोळंबा झाली असल्याचे बोलले जात आहे तरी याठिकाचे संबंधित तालुका अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे कधी कधी तर रात्री अप रात्री जर एखादा पेशंट आला असेल तर त्या ठिकाणी डाँक्टर उपलब्ध नसल्यामुळे परळी किंवा अंबेजोगाई येथे घेऊन जावा लागत असल्याने रुग्णांची खूप मोठी अडचण होऊन गैर सोय होताना दिसत आहे तवरीत ह्या आरोग्य केंद्राची परेशानी मार्गी लावावी अशी मागणी जनतेतून होत आहे .
Add new comment